शिरीष बोराळकर

सांस्कृतिक उपक्रम

शिरीष बोराळकर हे औरंगाबाद नवरात्र महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आहेत. त्यांनी औरंगाबाद परिसरातली सर्व नवरात्र संघटनांना एकत्र आणून दांडिया आणि गरबा यासाठी सुविधापूर्ण आयोजन करण्यात पुढाकार घेतला.

सांस्कृतिक उपक्रमांचे क्षेत्र त्यांच्या पसंतीचे राहिले आहे. कुमार सानू, अलका याज्ञिक आणि सोनू निगम यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांना विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने मराठवाड्यात आणण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. अशा प्रकारे, मराठवाड्यात कलाकारांचे सादरीकरण व्हावे यासाठी त्यांनी मजबूत पायाभरणी केली आहे. चांगले सांस्कृतिक कार्यक्रम मराठवाड्यात यावेत यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांची सर्वदूर प्रशंसा झाली आहे. विविध कलाप्रकारांत, वेगवेगळ्या पातळीचे कार्यक्रम होत रहावेत जेणेकरून मराठवाड्यातील प्रेक्षक कशापासूनही वंचित राहू नये, असा त्यांचा प्रयत्न असतो.

औरंगाबादमध्ये सर्वप्रथम भव्य प्रमाणात दहीहंडी स्पर्धा त्यांनी आयोजित केली होती. औरंगाबादमधील शिवजयंती उत्सवाचे ते सलग चार वर्षे अध्यक्ष होते. संपूर्ण शहरात गणेशोत्सवाची जबाबदारी असलेल्या सर्वपक्षीय गणेश संघाचेही ते अध्यक्ष होते.

संपर्क
  • Get Connect: