महाराष्ट्र भाजपाचे प्रवक्ते

शिरीष बोराळकर

शिरीष बोराळकर हे भारतीय जनता पार्टीशी संबंधित राजकीय नेते आहेत. हे अष्टपैलू व्यक्तिमत्व राजकारण, क्रिडा, पत्रकारिता आणि व्यवसाय अशा विविध क्षेत्रांत यशस्वी ठरले आहे. व्यक्तिशः, आपली मते प्रामाणिकपणे आणि खुलेपणाने मांडणारे आणि प्रशंसा झाली तर तिला दिलखुलास स्मिताने दाद देणारे हे आनंदी व्यक्तिमत्व आहे. राजकीय क्षेत्रात गेल्या तीन दशकांपासून ते सक्रीय आहेत आणि भाजपामध्ये विविध राजकीय पदांद्वारे जनतेच्या तसेच देशाच्या सेवेसाठी पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत.

शिरीष बोराळकर यांचे स्वप्न आणि व्हिजन

  • त्यांची पात्र तरुणांसाठी अधिकाधिक नोकरीच्या संधी निर्माण करून मराठवाड्यातील रोजगाराचा दर वाढवणे हा त्यांची व्हिजन आहे. त्यांच्या मते, मराठवाड्यातील तरुणांनी स्वतःचा न्यूनगंड दूर केला पाहिजे कारण त्यामुळे ते ज्यांसाठी पात्र आहेत अशा संधी त्यांना कधीही मिळत नाहीत. मराठवाड्यातील बुद्धिमान तरुणांना येथेच रोजगारांच्या संधी उपलब्ध केल्यास विभागाची प्रगती होऊ शकते असा त्यांचा दृष्टीकोन आहे.
  • 'स्कील इंडिया' पुढाकारावर त्यांचा दृढ विश्वास आहे आणि तरूणांनी रोजगार देऊ शकणाऱ्या कौशल्यांमध्ये नैपुण्य मिळवण्याचे ते समर्थन करतात. त्यांच्या मते, युवकांना स्वतःच्या जीवनात सर्वोत्तम ते प्राप्त करण्यासाठी अधिक जाणीवजागृती करण्याची आवश्यकता आहे.
  • विविध सार्वजनिक योजनांद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच देवेंद्र फडवणीस यांचा ज्या सुधारणा घडविण्याचा प्रयत्न राहिला आहे, त्यात त्यांचा पूर्ण विश्वास आहे. लोकांनी या योजनांचा लाभ घ्यावा असे त्यांना वाटते, त्यासाठी त्यांनी योजनांची माहिती प्रत्येकापर्यंत पोचविण्यासाठी उपक्रमांची आखणी केली आहे.
  • कार्यरत असलेल्या व्यक्ती तसेच बेरोजगारांच्या अधिक प्रगतीसाठी जे जास्तीत जास्त करणे शक्य आहे ते आपण भारतीय जनता पार्टीच्या मराठवाडा पदवीधर मतदारसंघ मतदार नोंदणी प्रकल्पाचा प्रमुख म्हणून केले पाहिजे, असे त्यांना वाटते.
  • शिक्षक, डॉक्टर, वकील, सनदी लेखापाल (सीए) इत्यादी व्यावसायिकांपुढच्या अडचणी ठळकपणे मांडाव्यात असे त्यांना वाटते. प्रोफेशनल्सना शक्य तितकी सर्वोत्तम रिसोर्सेस आणि पाायभूत सुविधा प्राप्त करण्यात साह्य करण्याचा त्यांचा मनोदय आहे जेणेकरून ही मंडळी भारताला अधिक मजबूत बनविण्यात योगदान देऊ शकतील.
ध्येयपूर्ती