पत्रकार शिरीष बोराळकर

शिरीष यांनी पत्रकार या नात्याने भारतीय क्रिकेट संघासोबत दौरा केला आहे. महानगर, लोकमत आणि तरूण भारत या सारख्या वृत्तपत्रांतून त्यांनी स्तंभलेखन केले आहे. त्यांचे स्तंभ बहुतांश वेळा संघाच्या कामगिरीचे वृत्तांकन करणारे, त्याच प्रमाणे सुरू असलेल्या सामन्यांवर तज्ज्ञदृष्टीने टिप्पणीही करणारे असत. क्रिडावेद या नावाने केवळ क्रिडाविषयाला समर्पित दिवाळी अंकाच्या 'टीम'मध्येही त्यांचा सहभाग होता, हा अंक महाराष्ट्रभरात लोकप्रिय झाला.

माध्यमांशी सातत्यपूर्ण संपर्कामुळे त्यांना प्रसारमाध्यमांची कार्यपद्धती समजून घेता आली. प्रवक्ता म्हणून स्वतःला घडविताना त्यांना त्याची मदत झाली.