राजकीय नेते शिरीष बोराळकर

राजकीय नेते शिरीष बोराळकर

उच्चशिक्षित कौटुंबिक पार्श्वभूमी लाभलेले शिरीष लहान वयापासून महत्त्वाकांक्षी आहेत. त्यांचा खेळांकडे असलेला कल आणि त्यांच्यातील नेतृत्वाची प्रतिभा लक्षवेधी होती. ते विविध उपक्रमांमध्ये पुढाकार घेत आणि त्यांच्या समाजिक जाणिवा अतिशय प्रखर होत्या.

गेली २९ वर्षे युवा मोर्चात सक्रीय असताना त्यांनी स्वतःची दूरदृष्टी आणि कल्पनाशक्तीसह दिलेले योगदान अगणित राजकीय मोहिमा यशस्वी करण्यात महत्वाचे ठरले आहे. श्री. लालकृष्ण अडवानी, गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन यांच्याशी त्यांचा निकटचा संपर्क राहिलेला आहे आणि लालकृष्ण अडवानी यांच्या सुवर्ण जयंती रथयात्रेसारख्या अनेक महत्वाच्या राजकीय उपक्रमांमध्ये त्यांना साह्य केले आहे.

त्यांनी २००० मध्ये गोपीनाथ मुंडे यांच्या निवडणूक मोहिमेत साह्य केले होते. लोकसभा, राज्य विधानसभा, महानगरपालिका, हिंगोली जिल्हा आदी क्षेत्रांमध्ये पक्षा प्रभारी म्हणून त्यांनी कौशल्याने जबाबदारी पार पाडली आहे. गोवा राज्य विधानसभा निवडणूक प्रचारात आणि मुंबईतही अनेक राजकीय मोहिमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. अनेक आमदार आणि महापौर पदासाठीच्या विविध राजकीय मोहिमांत त्यांनी मोठे योगदान दिले आहे.

गुजरातमध्ये २००२ मध्ये आलेल्या भूकंपाच्या वेळी, महाराष्ट्रातर्फे मदतकार्यात असताना त्यांनी पत्रकारांना आणि आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमाना तेथील नेमकी परिस्थिती जाणून घेण्यासाठी, सनसनाटीपणा टाळण्यासाठी मदत केली. आपद्ग्रस्त भागात सुरू असलेल्या सुधारणा, प्रयत्न आणि मदतकार्याची माहिती पुढे पोचविण्याचे महत्वाचे कार्य त्यांच्यावर सोपविण्यात आले होते.

या अनेक वर्षांच्या काळात त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात एक मजबूत सामाजिक वर्तुळ गुंफले आहे ज्यात राजकीय आणि अराजकीय पार्श्वभूमीच्या व्यक्तींचाही समावेश आहे. सकारात्मक वृत्ती आणि सामाजिक कौशल्ये यामुळे त्यांचा समर्थकांशी तसेच शासनयंत्रणेतील महत्वाच्या व्यक्तींशी उत्तम संपर्क असतो. भाजपाचा एक महत्वपूर्ण सदस्य या नात्याने, त्यांच्या पक्षातील इतर व्यक्तींशी सद्भावपूर्ण मैत्रिभावासह त्यांची वाटचाल सुरू आहे.

लोकांना मदत आणि मार्गदर्शन करीत सामाजिक सुधारणा घडविण्यात, शिक्षणाच्या महत्वाविषयी तरुणांमध्ये जागृती करण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. त्यांची दूरदृष्टी आणि पुढाकार घेण्याची वृत्ती यामुळे ते जनतेच्या विश्वासाला, अपेक्षेला पात्र ठरू शकतील असे विश्वसनीय नेते ठरले आहेत.

शिरीष सध्या महाराष्ट्र भाजपाचे प्रवक्ते आहेत. तसेच, मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील भाजपाच्या मतदार नोंदणी प्रकल्पाचे ते प्रमुख आहेत.