क्रीडापटू आणि प्रशिक्षक शिरीष बोराळकर

  • होम
  • करिअर
  • क्रीडापटू आणि प्रशिक्षक शिरीष बोराळकर

क्रीडापटू आणि प्रशिक्षक शिरीष बोराळकर

क्रीडाक्षेत्रातील कामगिरी आणि क्रीडासंघटन क्षेत्रातील योगदानाबाद्दल शिरीष यांना महाराष्ट्र शासनाने १९९७ मध्ये शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराने गौरविले आहे. महाराष्ट्रात क्रिडापटूंना दिला जाणारा तो सर्वात प्रतिष्ठेचा पुरस्कार आहे.

ते प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पश्चिम विभागाकडून कर्णधार संजय मांजरेकर यांच्या नेतृत्वात खेळलेले आहेत. मनिंदरसिंग, राजू कुलकर्णी आणि चंद्रकांत पंडित अशा ख्यातनाम खेळाडूंसोबत ते क्रिकेट खेळले आहेत. विद्यापीठ संघाचे त्याप्रमाणे जिल्हा पातळीवर क्रिकेट संघाचे नेतृत्व त्यांच्याकडे होते आणि पुणे विद्यापीठ संघासाठीही ते खेळले आहेत.

पश्चिम विभागीय विजेत्या पुणे विद्यापीठाच्या बॅडमिंटन संघात त्यांचा समावेश होता. ते सलग दहा वर्षे मराठवाड्याचे बॅडमिंडटन चॅम्पियन होते. महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे ते उपाध्य आहेत, त्याचप्रमाणे औरंगाबाद जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन आणि औरंगाबाद प्लेअर्स डेव्हलपमेंट असोसिएशनचे (एपीडीए) ते अध्यक्ष आहेत. ते महाराष्ट्र अॅमॅच्युअर क्रिएटिव्ह क्लबचे माजी अध्यक्ष आणि महाराष्ट्र टच रग्बी असोसिएशनचे माजी कार्याध्यक्ष आहेत. ते औरंगाबाद जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे संयुक्त सचिव होते, ते औरंगाबाद जिल्हा टेबलटेनिस असोसिएशनचे आजीव सदस्य आहेत आणि औरंगाबाद जिल्हा महिला क्रिकेट असोससिएशनचे मानद सचिव म्हणूनही त्यांनी कार्य केले आहे.

त्यांनी अनेक खेळाडूंना प्रशिक्षण दिले आहे. ख्यातनाम कवी फ. मुं. शिंदे यांच्या कन्या ऋचा शिंदे (शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेती), दीपाली रोकडे, रुपा तेलंग आणि सिद्धार्थ पाटील आदींचा त्यांनी कोचिंग दिलेल्यांत समावेश आहे.

मराठवाड्यात महिला क्रिकेटमधील पहिला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना (भारत विरुद्ध न्यूझिलंड, २००३- २००४) संघटन सचिव या नात्याने संघटित करणारी पहिली व्यक्ती ठरण्याचा मान त्यांना प्राप्त आहे. आशियाई सॉफ्टबॉल स्पर्धा, राष्ट्रीय शालेय बॅडमिंटन क्रिडास्पर्धा, महिला क्रिकेटच्या राष्ट्रीय स्पर्धा आणि राज्यपातळीवरील विविध स्पर्धांचे आयोजन त्यांच्या पुढाकाराने झाले आहे.